Breaking

गुरुवार, ५ मे, २०२२

बापरे ! गाडी चालू असताना गाडीच्या शिट खालून निघाला विषारी नाग साप.

संग्रहित छायाचित्र

       आज मादनाईक मळा, जयसिंगपूर येथे रात्री दोन वाजता आदिनाथ मादनाईक हे शेतात पाणी पाजण्यासाठी त्यांच्या दोन चाकी गाडीवरून निघाले असता त्यांना फुत्कारण्याच्या आवाजावरून शंका आल्याने गाडी थांबवून पाहिले असता त्यांना गाडीच्या शिटखाली विषारी नाग जातीचा साप आढळून आला. त्यांनी तात्काळ जयसिंगपूरचे प्राणीमित्र अक्षय मगदूम यांना संपर्क साधला. रात्री दोन वाजताही अक्षय मगदूम तत्परतेने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या सापाला पकडुन सुरक्षित स्थळी सोडले.

        आदिनाथ मादनाईक त्यांच्या चौकसबुद्धी आणि सतर्कतेमुळेच त्यांना गाडीच्या शिटखाली साप असल्याचे जाणवले. त्यामुळेच वाईट घटना घडायची टळली अन्यथा कदाचित त्यांना सर्पदंश झाला असता.

      साप हे ऊन, थंडी आणि पावसापासून आसरा मिळवण्यासाठी मनुष्यनिर्मित मजबूत वस्तू जसे की घर,छप्पर, गाडी इत्यादी ठिकाणी जाऊन बसू शकतात.विशेषतः शेतकरी शेतात गाडी घेवून जातात, तेव्हा ऊब मिळवण्यासाठी साप गाडीमध्ये जाऊन बसतात.त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवसा किंवा रात्रीच्या शेतात गाडी घेवून गेल्यास निघताना एकवेळ जरूर गाडीची पाहणी करून बसावे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस बाहेर पडणारे म्हणजेच निशाचर विषारी साप दिसून येत नाहीत, त्यामुळे रात्री शेताकडे किंवा कुठेही बाहेर पडताना हातात बॅटरी, काठी व पायात गमबुट घालावे, प्राणीमित्र अक्षय मगदूम यांनी सांगितले. 

शेतातील विजेच्या पेटीत वरचेवर साप आढळतात

शेतात साप सहजासहजी दिसून येत नाहीत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा