![]() |
सांगलीच्या कृष्णा नदीवरील आर्यवीन पुलावर भीषण अपघात |
*प्रा. इम्रान मणेर : विशेष प्रतिनिधी*
सांगली - कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावर भीषण अपघात घडला आहे. अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर आठ ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. छोटा टेम्पो आणि मारुती वॅगनार गाडीमध्ये समोरासमोर धडक होऊन हा भूषण अपघात झाला आहे.
सांगली शहरात आयर्विनपूल या ठिकाणी एक टेम्पो आणि वॅगनार या वाहनांमध्ये रात्री १०.०० च्या सुमारास समोरासमोर धडक झाली आहे. या भीषण अपघाता मध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
छोटा टेम्पोमधून तुंग येथील भजनी मंडळ सांगलीवाडीकडून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळकडे भजन कार्यक्रमासाठी निघाले होते. तर सांगलीहुन एक कुटुंब कसबे डिग्रजच्या दिशेने मारुती वॅगनार गाडी मधून निघाले होती. दोन्ही गाड्या भरधाव होत्या. गाड्या आयर्विन पुलावर आल्या असता भरधावपणे दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली.
या मध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये टेम्पो चालक आणि टेम्पोमधील एक वृद्ध महिला यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही गाड्यांमध्ये असणारे सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सांगली पोलिसांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मृत आणि जखमींची माहितीची नोंद घेण्याचे काम सुरू होतं.
या भीषण अपघाताची तीव्रता इतकी होती की बघ्याचे डोळे पाणावले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा