Breaking

शनिवार, २१ मे, २०२२

*महाराष्ट्राची पुन्हा पुरोगामित्वच्या दिशेने वाटचाल ; बोरगावात भजन व कीर्तन बंद करून गावाच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध असल्याचा ठराव*


मालेगाव तालुक्यातील बोरगाव गावाने  केला ठराव

 वाशीम :  ग्रामीण भागात कीर्तन, भजन, यासारख्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले जातात. यातून गावाचा विकास होत नाही. मात्र हे कार्यक्रम असे कार्यक्रम राबविण्याचा बंद करण्याचा ठराव पारित करून निर्णय घेतला आहे. गावाच्या विकासावर भर देण्याचा गावातील ठराव बोरगावच्या ग्रामस्थांनी मंजूर केला आहे.मालेगाव तालुक्यातील बोरगाव या गावाने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

    मालेगाव तालुक्यातील बोरगाव हे १ हजार ६०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात दरवर्षी कीर्तन, सप्ताहावर नाही. लाखो रुपये खर्च केले जायचे. हा अनाठायी होणारा खर्च कमी करून या पैशांतून गावात झाडे लावून झाडे जगविण्याची शपथ गावकऱ्यांना देण्यात आली. गावात ग्रामगीता वाचन आणि शेतकरी कार्यशाळा घेऊन संकटात असलेला शेती व्यवसाय फायद्यात कसा आणता येईल.दिली जाणार नाही. तसेच गावात लहान ग्रंथालय उभारून त्यात समाजसुधारक आणि क्रांतिकारकांचे पुस्तके आणून एक समर्थ पिढी घडवण्याचा ग्रामस्थांचा विचार आहे. 

       कोणतेच कर्मकांड व विधी पुजारी कडून करून घ्यायचे नाही. त्यासाठी गावातील तरुण मुले व सुशिक्षित लोक हे विधी करतील असे ठरविण्यात आले. जेणेकरून दान व लग्न लावण्याची फी कोणालाही द्यावी लागणार नाही.मंदिर व देवांना दान दक्षिणा देण्यापेक्षा प्रत्येक दिवशी पैसे जमा करून गरीब व गरजू शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे. आजही राज्यभरात शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि ग्रामीण भागात भजन, कीर्तन आणि अंधश्रद्धेच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले जातात. याच गोष्टीला फाटा देत बोरगावच्या गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय इतर गावांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा