![]() |
विजयराज कोळी याच सत्कार करताना मा.गणपतदादा पाटील |
ओंकार पाटील : शिरोळ प्रतिनिधी
शिरोळ : महात्मा गांधी रिसर्च फौंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महात्मा गांधी विचार संस्कार लेखन स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विजयराज कोळी ( शिरोळ ) यांचा दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
येथील दत्त उद्योग समूहाच्या वतीने साखर कारखाना कार्यस्थळावर चेअरमन गणपत दादा पाटील यांच्या हस्ते कोळी यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्यासह राजेंद्र प्रधान, खंडेराव हेरवाडे, दगडू माने, अभिषेक कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते,
येथील विजयराज कोळी यांनी महात्मा गांधी विचार संस्कार लेखन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे, जयसिंगपूर कॉलेज च्या राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमात महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते श्री कोळी यांना गोल्ड मेडल, सन्मानपत्र व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.सौ एम व्ही काळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे डॉ. महावीर अक्कोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते, दरम्यान, लेखन स्पर्धा परीक्षेचे समन्वयक बाहुबली भनाजे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, प्रा.एस.बी.डफळापूरकर,प्रा.साजिदा आरवाडे यांनी सहकार्य केले ,दरम्यान कॉलेजच्या पदव्युत्तर विभागा मधूनही श्री.कोळी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
विजयराज कोळी यांनी मिळवलेल्या या सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा