![]() |
मा.इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील अशोक पुजारी स्पर्धा परीक्षा केंद्राच्यावतीने बुधवार ( दि.२५ मे ) रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे . माजी सनदी अधिकारी व सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख ( काकाजी ) यावेळी मार्गदर्शन करणार आहेत .
अमृतवाणीतून प्रबोधनाद्वारे समाजात सदपरिवर्तन घडविणारे विचारवंत वक्ते हजारो युवकाच्या आयुष्यात चैतन्य फुलवणारा ज्ञानाचा ऊर्जेचा प्रेरणेचा अखंड स्रोत आध्यात्मिक साधक , संतसाहित्याचे अभ्यासक , वारकरी संप्रदायाचे आचरणकर्ते , कृतिशील समाजसेवक , साहित्यिक श्री इंद्रजीत देशमुख यांनी प्रशासकीय सेवेत असतांना गटविकास अधिकारी , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , उपायुक्त अशा पदावर कार्यरत असताना शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या माणसा पर्यंत पोहोचवल्या भ्रष्टाचार निर्मूलन , व्यसनमुक्ती , स्वच्छता अभियान अशा विविध उपायांचा अवलंब करीत जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने काम केले . प्रशासनात राहून निस्वार्थी भावाने , लोककल्याणासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा उच्च आदर्श त्यांनी पुढच्या पिढ्यांना घालून दिला आहे अश्या थोर व्यक्तीचा विद्यार्थी व पालक याना मार्गदर्शन मिळावे यासाठी उद्या हॉटेल मंगलम येथे सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे .
यावेळी अशोकराव पुजारी , अभिजित जगदाळे याची प्रमुख उपस्थिती असणार आहे.केंद्रामार्फत आयोजित केलेले हे चौथे पुष्प असून यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी उपस्थित रहावे , असे आवाहन समन्वयक जितेंद्र आणुजे व दर्शन वडेर यानी केले आहे .
Great 👍
उत्तर द्याहटवा