*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
कोल्हापूर : रॉबिन हूड आर्मी आणि लव्ह केअर शेअर ग्रुप तर्फे अखंड दोन महिने कोल्हापूरकरांसाठी अनेक ठिकाणी ताक आणि अन्नाचे पॅकेट वाटप करीत आहेत. ही मोहीम १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत चालणार आहे. या मोहिमेसाठी दररोज अनेक स्वयंसेवक एकत्र येऊन प्रभावित झालेल्या वंचित समुदायांना, गरजूंना याचे वाटप केले जात आहे.
रॉबिन हूड आर्मी, एक स्वयंसेवी संस्था, जी अतिरिक्त अन्न गोळा करण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी ओळखली जाते, सलग दोन महिने म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत कोल्हापुरातील जवळपास ३०,००० ते ५०,००० वंचित लोकांना ताक व अन्नाचे पॅकेट वाटप करण्याच्या मोहिमेवर आहे. या मोहिमेसाठी कोल्हापूरातील अनेक दानशूर व्यक्तीं या मोहिमअंतर्गत जोडले गेलेले आहेत.
लव्ह केअर शेअर ग्रुप द्वारे वितरण मोहिमेअंतर्गत दररोज ४०० पाकीट मसाले ताक व आठवड्यातून एक दिवस ४०० हंगर किट (दाल खिचडी) पुरवले जात आहे. जे बेघर, गरजू, वंचित आणि प्रवासी भाविक इतरांना पुरवत आहे. कोल्हापूर मध्ये दररोज साधारण दुपारी १२ च्या दरम्यान महालक्ष्मी मंदिर, सेंट्रल बस स्टँड, सी पी आर रुग्णालय, भाजी मंडई व शहरातील अन्य ठिकाणी याचे अखंड वाटप चालू आहे.
या मोहिमेत लव केअर शैअरचे सदस्य हार्दिका वसा, देवांग शेठ , हर्षित भेदा आणि राॅबिन हुड आर्मी चे स्वयंसेवक सागर अथणे, संजय पाटील, अमर बोधले, रामनाथ बलिंगा, विश्वास जाधव, शीतल कडगावे, प्रसाद सोनुले,अमित परमार आणि विशाल गुडूळकर यासाठी सक्रिय सहभाग घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा