![]() |
खरसुंडी येथे खिलार बैलांचा बाजार |
*प्रा. इम्रान मणेर : विशेष प्रतिनिधी*
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे खिलार बैलांचा यात्रेस मोठा प्रतिसाद या वर्षी मिळाला, या यात्रेमध्ये जवळपास १० ते १२ हजार जनावरे दाखल झाली होती. यावर्षी या यात्रेत विक्रम ५.७५ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
खरसुंडी येथे सोमवार ते गुरुवार यादरम्यान यात्रा झाली, या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांची खरेदी विक्री झाली. खरसुंडी मुळातच जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी जवळपास १० ते १२ हजार जनावरे दाखल झाली. यावर्षी जवळपास ५ कोटीहून अधिक उलाढाल होईल, असा अंदाज यात्रा कमिटी कडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र ५.७५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या यात्रेत जातीवंत खिल्लार बैलांना मोठी किंमत मिळाली. जवळपास ५० ते ७५ हजार रुपये असा भाव खिलार मिळाला.जातिवंत खिल्लार बैलांसाठी खरसुंडी ची यात्रा प्रसिद्ध आहे. गेली दोन वर्षे यात्रा न भरल्याने यावर्षी नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता. कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यातून जनावरांमध्ये मोठी आवक दिसून आली.बाजार समिती व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या वतीने यात्रेमध्ये जागावाटप, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य व्यवस्था इत्यादी पाहण्यात आले होते, तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा