Breaking

गुरुवार, १२ मे, २०२२

*टेन्शन मत लो यार...१३ मे जागतिक ताणतणाव मुक्ती दिन*


ताणतणाव व्यवस्थापन 

पुरोगामी योध्दा-खंडेराव पार्वतीशंकर हेरवाडे-परिवार शिरोळ


      रोजच्या धकाधकीच्या जीवनात हास्य बिलकूल नाहीसे झाल्याने तणाव वाढत आहे ताणतणाव वाढण्याची कारणे अनेक असली तरी त्यावर उपाय एकच खळखळून हसणे प्रसन्न राहणे निराश न होता चित्त आनंदी ठेवणे ख्यातनाम लेखक जे.के. रोलिंग यांच्या शब्दात सांगायचं तर आनंदी जीवन जगण्यासाठी कौशल्ये आत्मसात करा प्रयत्न करुनच असे प्रसंग जीवन जगता येईल ताणमुक्तीसाठी ठरवून प्रयत्न करायला हवेत तणावाची कारणे व्यक्तीगत समस्या आपण एखाक्या आजाराने ग्रस्त असू किंवा शरीर आपल्याला साथ देत नसेल तर आपण तणावाखाली जगतो भावनिक समस्या भाव भावनांचा होणारा गुंता सोडवणे शक्य न झाल्यास ताण निर्माण होतो. यातून नैराश्या,एकलकोंडेपण आदी विकार उद्भवतात. बिघडलेले नाते संबंध नाते संबंधात काही अडचणी उद्भवल्यास ताणतणाव निर्माण होतो. महत्वाचे बदल जीवनात काही महत्वाचे बदल झाले आणि कदाचित ते आपल्या मनासारखे नसतील तर ताण निर्माण होतो सामाजीक अशांतता परिसरातील न पटणाऱ्या घटना कामाच्या ठिकाणचा ताण बेरोजगारी आदितून ताण उद्भवतो तणावांची चिन्हे चीड येणे, नैराश्य येणे दुःख वाटणे हृदयाच्या क्रियेत येणे, श्वास घेताना त्रास होणे, सतत घाम येणे झोप न येणे, अस्वस्थ वाटणे, पोट बिघडणे, भुख कमी होणे, थकवा जाणवणे, वजन घटणे ताणतणावमुळे होणारे आजार हृदयरोग, पक्षघात, उच्चरक्तदाब, मधुमेह, पोटाचे विकार, अपचन, थकवा अस्वस्थता तणावावर उपाय सर्व प्रथम तणावाच्या कारणाचा शोध घ्या. ज्या पासून ताण कमी होईल अशी गोष्ट करा.

     यासाठी कोणताही छंद जोपासा त्या मध्ये स्वतःला गुंतवा एका वेळी एकच काम करा कामाचा ताण घेऊ नका नकार द्यायला शिका किमान आठ तास रात्रीची झोप होईल ते पाहा पौष्ठिक अन्नावर भर क्या या आहारात फळे पालेभाज्यांचा वापर करा. आपल्या समस्या मित्रांना सांगा पालक सहकाऱ्यांशी मनमोकळेपणानेच बोला तंबाखूजन्य पदार्थ मक्य, चहासारखे उतेजक पेये टाळा, गरजपडल्यास डॉक्टर वा समुपदेशकांची मदत घ्या. माणसाच्या प्रगतीसाठी ताण आवश्यक आहेच पण त्याच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होऊ नये असा जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचा आहे. ताणावर नियंत्रणासाठी प्रत्येकाने जीवन शैलीत बदल आत्मपरिक्षण करून संयम वाढवावा आजच्या ताणतणाव दिनी हा संकल्प करुया....


हेरवाडे परिवार, शिरोळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा