Breaking

गुरुवार, १९ मे, २०२२

*धक्कादायक !स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणांने लग्नाचे आमिष दाखवित युवतीवर केला अत्याचार ; जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद*

 

जयसिंगपूरातील तरुणीवर अत्याचार

*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


जयसिंगपूर : युवकाने लग्नाचे आमिष दाखवित- धमकी देत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी येथील तरुणा विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच संशयित आरोपीला रात्री उशिरा अटक झाली असून अनिल बाळू वडर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

    संशयित आरोपी व पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे असून दोघे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारी करताना सन २०१६-१७ मध्ये ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व त्यानंतर प्रेमसंबंधात झाले. संबंधित संशयित आरोपीने पीडित तरुणी घरी असताना आपण लग्न करूया असे सांगून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आई-वडिलांना मारहाण करण्याची धमकी देत होता. दरम्यान पीडितेच्या तक्रारीवरून संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

       या घटनेची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा