![]() |
प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. चिदानंद आवळेकर मार्गदर्शन करताना |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
जयसिंगपूर : छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी स्मृति कृतज्ञता पर्व या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात अभिवादन करण्यासाठी विविध उपक्रमांची रेलचेल सुरू आहे.
जयसिंगपुरात शिरोळ तालुक्यातील समविचारी पुरोगामी संघटनांनी कॅन्डल मार्च अभिवादन रॅली काढून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. यामध्ये
छ.शाहू महाराज की जय,!
हिरे माणके मोती उधळा!
जय शाहू राजा मानाचा मुजरा तुजला !
या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आरक्षणाचे जनक असणारे आणि रयतेच्या कल्याणासाठी आपले राज्य पणाला लावणारे थोर राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय.
जातीभेद दूर व्हावा म्हणून कायदे करणारे,स्वतः शिक्षणाचे महत्व प्रजेला सांगून गावोगावी प्राथमिक शाळा सुरू करून सर्व जातीधर्माच्या मुला मुलींना शिक्षणाची सोय करणारे शाहू महाराज, केवळ प्राथमिक शिक्षणाने माझी प्रजा विभूषित झाली तरी माझे राज्य मी त्यांच्या स्वाधीन करीन अशी गर्जना करून कृतिशील जगणारे शाहू राजे,कुस्ती खेळासाठी प्रोत्साहन देवून कुस्ती मध्ये चांगले मल्ल तयार व्हावेत म्हणून खासबाग मैदान बांधणारे, कलेच्या माध्यमातून लोकांना केशवराव भोसले नाट्यगृह बांधून देणारे कलाप्रेमी तर शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाण्याची सोय करून कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करणारे शेतकरी उद्धारक आणि विषमतेवर आधारित शोषणावर आधारित व्यवस्था नाकारून समतेचा विचार घेऊन रयतेला न्याय मिळवून देणारे महान राजे म्हणजे शाहू महाराज होय.जयसिंगपूर नगरीचे जनक असणारे शाहू राजे अशा बहु आयामी समतावादी राजर्षी शाहू महाराज यांचे स्मुर्ती शताब्दी वर्ष ६ मे पासून सुरु होत आहे.
अशा कर्तृत्ववान राजाचा कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा. समाजात आज जे जातीय धार्मिक विष पेरून सामाजिक वातावरण कलुशित करण्याचा जो धर्मांध लोकांनी डाव मांडला आहे तो मोडून काढण्यासाठी शाहू यांच्या विचारांची गरज नव्या पिढीला समजावी म्हणून समाजवादी प्रबोधिनी, लाल बावटा कामगार युनियन, राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती,शिरोळ तालुका पुरोगामी मंच,सर्व पुरोगामी संघटना आणि शाहू प्रेमी जनतेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी जयसिंगपूर येथे ५ मे रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत नगरपालिका चौक ते क्रांती चौक मेणबत्ती अभिवादन फेरी काढण्यात आली.
यासाठी डॉ. चिदानंद आवळेकर, प्रा .शांताराम कांबळे, एफ वाय कुंभोजकर, प्रा.अशोक शिरगुप्पे, डॉ. महावीर अक्कोळे, प्रा.ए.एस.पाटील,प्र. प्राचार्य प्रा.वाय.एम. चव्हाण, प्रसिद्ध साहित्यिक नीलमताई माणगावे,मा. सतीश मलमे, सावंत गुरुजी ,कॉ.रघुनाथ देशींगे,डॉ. अतिक पटेल, चंद्रकांत जाधव(बापू), रमेश शिंदे प्रा.डॉ.तुषार घाटगे,प्रा.डॉ. सुनील बनसोडे,खंडेराव हेरवाडे,सचेतन बनसोडे व अन्य घटकांची सहभाग घेतला होता. राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ यांनी नियोजन केले.
सदर कार्यक्रमास प्रचंड प्रमाणात शाहूप्रेमी नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा