![]() |
सांगलीचे प्रा. संजय ठिगळे यांचा सन्मान |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य आणि भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख अर्थतज्ञ व सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. संजय ठिगळे यांच्या 'अर्थभान' या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ' बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल ग्रंथ पुरस्कार' प्राप्त झाला.सदरचा पुरस्कार ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या११६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे उपस्थित होते.
पुरस्काराविषयी बोलताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, माझ्या 'अर्थभान ' पुस्तकाची दखल घेऊन पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेने मला गौरविले. त्यामुळे लिखाणासाठी एक नवीन ऊर्जा मिळाली. इथून पुढच्या शाश्वत आर्थिक विकास आणि डिजिटल आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने अखंडपणे लिखाण करण्याचा आणि प्रबोधन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास प्रा. सुभाष दगडे, सौ. सुवर्णा ठिगळे, सौ शारदा शेटे, शंकर शेटे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह ना. डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी त्याचबरोबर प्राचार्य डॉ. व्ही. वाय. कदम यांनी अभिनंदन केले आहे.
प्रा.संजय ठिगळे यांना बँक ऑफ इंडिया लोकमंगल पुरस्काराने सन्मानित करताना ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी त्यांच्यासमवेत डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. मिलिंद जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रा. संजय ठिगळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा