![]() |
प्रा.सौ.स्वाती माळकर व प्राचार्य डॉ.एस.एस.शेजाळ |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
मिरज : प्रा.स्वाती अशोक माळकर-जगनाडे यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. कार्यशील प्राचार्य डॉ.एस.एस.शेजाळ यांच्या उत्तम व सुयोग्य मार्गदर्शनाखालील केलेल्या "वैद्यकीय सेवा क्षेत्राचा मिरज शहराच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास" या संशोधन शीर्षकाखाली विद्यापीठास पीएच.डी.चा प्रबंध सादर केला होता. शिवाजी विद्यापीठाने सदर संशोधन प्रबंधास मान्यता देत त्यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी.पदवी प्रदान केली.
प्रा. स्वाती माळकर यांची अध्यापनाची सुरुवात जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथून केली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध सादर व प्रकाशित केले आहेत. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात सातत्याने सक्रिय सहभाग व एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका म्हणून कॉलेजमध्ये ओळखलं जाते.
सांसारिक आयुष्य जगत असताना कुटुंबियांनी दिलेला आधार तसेच शिक्षणाचा ध्यास व परिवर्तनवादी विचार, जिद्द-चिकाटी, सर्व घटकांशी मैत्रीपूर्ण संबंध याच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.मिरज येथील स्वाती अशोक माळकर उर्फ सौ.स्वाती तुषार जगनाडे यांचे माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल घुणकी येथे पूर्ण झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण SNDT विद्यापीठाच्या श्रीमती सुशीला देवी मल्हारराव देसाई कन्या महाविद्यालय पेठ वडगाव येथे पूर्ण झाले .यानंतर शिवाजी विद्यापीठा मध्ये डॉ.आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन मधून कमवा व शिका या अंतर्गत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी भवन मध्ये मिळालेल्या विचार, कार्य व संस्काराची शिदोरी घेऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात M.Phil. पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना सासरचा व माहेरचा पूर्ण पाठिंबा मिळाला.
प्रा.स्वाती माळकर यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. एस.एस. शेजाळ हे लाभले होते. तसेच शिवाजी विद्यापीठांमधील अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ. पी. एस. कांबळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.तसेच जयसिंगपूर कॉलेजचे डॉ.प्रभाकर माने यांचे ही सहकार्य मिळाले. त्यांच्या सुयशात त्यांचे पती तुषार जगनाडे ,सासू श्रीमती कांचन जगनाडे ,दीर गिरीश जगनाडे,आई सिंधू माळकर इ,चे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.
आयुष्याच्या खडतर प्रवासात त्यांना अनेक संकटांवर मात करीत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीची जाणीव ठेवून मातापित्यांना आपले दैवत मानून गुरुजनांचा ज्ञान-विचारांचा आशीर्वाद घेत, व जीवाभावाच्या मित्रांच्या साथीने त्यांनी आतापर्यंतचा खडतर प्रवास पूर्ण केला.या संशोधन कामी त्यांना अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले.एकूणच त्यांच्या या प्रवासात गुरुजनांनी व मित्रांनी केलेल्या सहकार्य व विश्वास यामुळे त्यांना हे सुयश प्राप्त झाले.
त्यांच्या या सुयशात त्यांचे गुरुवर्य मार्गदर्शक प्रो.डॉ.शेजाळ यांनी प्रा. स्वाती माळकर यांच्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी केलेले उत्तम मार्गदर्शन व दाखविलेला विश्वास यामुळे ही पदवी संपादन करू शकले.
महिला प्राध्यापिका म्हणून स्वाती माळकर- जगनाडे यांनी या संघर्षमय प्रवासावर उत्तम मात करीत अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केल्याने सर्व घटकांकडून त्यांचे मनापासून कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा