Breaking

शनिवार, १८ जून, २०२२

* कोल्हापूर जिल्ह्यातील चित्री येथे २६ जूनला रंगणार भव्य मॅरेथॉन*

 

चित्री येथे मॅराथॉन स्पर्धा


*प्रा. अक्षय माने  : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर : रननिती तर्फे या वर्षी दिनांक २६ जून २०२२, रविवार चित्री, आजरा या ठिकाणी ‘चित्री अल्ट्रा मॅरेथॉन २०२२’ चे आयोजन करीत आहेत. हे स्पर्धेचे पहिलेच वर्ष असून या मॅरेथॉन साठी देशभरातून तसेच विदेशातून स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. याठिकाणी होणारी हि एकमेव स्पर्धा आहे. 

       अशा धरण ठिकाणी होणारी हि भारतातील एकमेव मॅरेथॉन स्पर्धा आहे. अवघ्या काही वर्षातच हि स्पर्धा 'भारतातील धरण मॅरेथॉन' म्हणून नावारूपाला येईल.  १२ तास, ७५ किमी, ५० किमी, ४२ किमी २१.१ किमी, १५ किमी, १० किमी आणि ५ किमी या विभांगामध्ये हि स्पर्धा पार पडेल . या स्पर्धेचा मार्ग - सुरुवात ऍडव्हेंचर रिसॉर्ट आवंडी गाव, धनगरवाडा नं. १, चित्री डॅम कडून परत  येऊन  ऍडव्हेंचर रिसॉर्ट येथे संपेल. सहभागी स्पर्धकांना टीशर्ट, मेडल, बॉटल, टाईमिंग बिब, सर्टिफिकेट आदी देण्यात येणार आहे

     या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठीची अधिक माहिती www.runniti.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन रननिती चे संस्थापक विशाल गुडूळकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा