![]() |
मालू हायस्कूलचा वेदांत सुधाकर झेंडे , राज्यात प्रथम |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिक्षण क्षेत्रात अत्यंत गुणवत्तापूर्ण, अनुभवी व ऐतिहासिक कामगिरी करणारी शिक्षण संस्था म्हणून दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे नावलौकिक सर्वत्र आहे. याच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या जयसिंगपूरातील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचा कु.वेदांत सुधाकर झेंडे १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे जयसिंगपूरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान वेदांत याचा सत्कार सर्वस्तरातून करण्यात आला.
मालू हायस्कूलचा निकालही १०० टक्के लागला आहे.२०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर १२० डिस्टिंक्शन , ६० फर्स्ट क्लास, २३ द्वितीय श्रेणी, ५ पास, तर ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी २१ आहेत. यामध्ये कु.वेदांत सुधाकर झेंडे याने १०० टक्के गुण मिळवून राज्यात व शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर व्दितीय श्रेया सुनील जाखले ९७.४० टक्के, तृतीय स्वदिप दीपक जाधव व प्रज्ञा बलभीम शिंदे ९७.२० टक्के तर संस्कृत विषयात १०० गुण मिळवणारे ८. गणितमध्ये १०० गुण मिळवणारे ०२, विज्ञानमध्ये १०० गुण मिळवणारा १, समाज शाखमध्ये १०० गुण मिळवणारे २ विद्यार्थी आहेत.
राज्यात प्रथम येणारा वेदांत झेंडे हा सर्वसामान्य कुटूंबातला असून वडील सांगली येथील कंपनीत मॅनेजर असून आई घरकाम करते. अशा बिकट आर्थिक स्थितीत असताना वेदांत याने चांगला अभ्यास करून १००% गुण मिळविले. या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
त्याच्या या सुयशात संस्थेचे अध्यक्ष, सचिव, इतर सर्व पदाधिकारी, हायस्कूलचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
त्याच्या या ऐतिहासिक यशाचे सर्व घटकातून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा