![]() |
चोरट्यास जेरबंद केल्यानंतर शिरोळ गुन्हेशोध पथकाची टीम |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
शिरोळ : नांदणी नाका लमाण वसाहत मधील घरफोडी गुन्हया प्रकरणी आकाशवाणी केंद्र सांगली येथुन एक संशयीतास ताब्यात घेवून गुन्हयात चोरीस गेलेला ३०,०००/- रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आले.
शिरोळ पोलीस ठाणेत दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १९/०२/२०२२ रोजी रात्री १०.०० ते दिनांक २०/०२/२०२२ रोजी सकाळी ०६.०० वाजण्याच्या दरम्यान आपले राहते घराचा दरवाजा पुढे करून झोपले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचा पुढे केलेला दरवाजा उघडुन आत प्रवेश करून फिर्यादीचे उशी शेजारी ठेवलेला ओपो रेनो ६ कंपनीचा मोबाईल त्यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरून नेलेबाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिली होती.
सदर गुन्हयाच्या तपासाबाबत मा. पोलीस निरीक्षक मा. दत्तात्रय बोरिगिडडे शिरोळ पोलीस ठाणे यांनी गुन्हे शोध पथकाकडील अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सांगीतले होते. त्याप्रमाणे सदर गुन्हयाबाबत सखोल तपास करुन मोबाईलच्या तांत्रीक माहीतीच्या आधारे व गोपनीय बातमीदारमार्फत बातमी काढून सदर गुन्हयातील संशयीत इसम नाम विनायक आनंदा आठवले व व २३ राहणार- भोसले प्लॉट नं-१०, कोल्हापुर रोड, एस.टी. कामगार भवन जवळ, सांगली ता.मिरज जि. सांगली याचा सदर गुन्हयात सहभाग असलेबाबत गुन्हे शोध पथकाची खात्री झालेने त्याला सापळा रचुन आकाशवाणी केंद्र सांगली परीसरातुन शिताफीने ताब्यात घेतले. सदर गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली व गुन्हयास चोरीस गेलेला ओपी रेनो ६ कंपनीचा मोबाईल किंमत ३०,०००/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेले आहे.
सदर आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपींना गुन्हयाच्याकामी अटक करणे आलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक २१११ ताहीर मुल्ला हे करीत आहेत.सदरची कारवाई मा. रामेश्वर वैजने उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपुर विभाग, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ प्रदीप कुंभार, ज्ञानेश्वर सानप, पोलीस नाईक ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, पोलीस अंमलदार रहीमान शेख, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार सचीन वॅडखळे या पथकाने केली आहे.
शिरोळ पोलीस ठाण्याच्या या गुन्हे शोध पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा