Breaking

बुधवार, १ जून, २०२२

साकव्य संस्था मुंबईचे कविसंमेलन दिमाखात पार पडले



*साहित्य, कला यांच्या  कितीतरी संस्था समुह आहेत . पण या दोन्ही माध्यमांना कवेत घेवून व्यक्तित्व विकास घडविणारी एकमेव संस्था म्हणजे साकव्य* 

 *•••• गझलानंदा  माई  प्रा. सुनंदा पाटील*





        साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच चा पाक्षिक कवी कट्टा क्र. १६, माई अर्थात सुनंदा पाटील मॅडम, गझलानंदा, सुरेश भटांच्या मानस कन्या यांचे अध्यक्षतेखाली खूप उत्साहात संपन्न झाला. "साहित्य आणि कला यांचे कितीतरी समुह , संस्था आहेत . पण या दोन्ही माध्यमांना कवेत घेवून व्यक्तित्व विकास घडविणारी एकमेव संस्था म्हणजे साकव्य " .  दि. ३१ मे रोजी संपन्न  झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना आम्ही लेखिकाच्या अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक प्रा. सुनंदा पाटील यांनी प्रतिपादन केले . या कविसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी सर्व विदेशातल्या कवयित्री कविता सादर करीत होत्या .

रसग्रहणात्मक समीक्षक म्हणून अगदी परिपक्वतापूर्वक  जबाबदारी पार पाडली ती डॉ. स्वाती घाटे मॅडम जयपूर राजस्थान, आणि सौ. अंजली मराठे बडोदा गुजराथ  यांनी. कविता सदरकर्त्या  आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कवयित्री सौ अरूणा मुल्हेरकर मिशिगन अमेरिका. कवयित्री, लेखिका व चित्रकार की ज्यांचे चित्र प्रिन्स चार्लस् च्या गॅलरीत विराजमान आहे अश्या शिल्पा तगलपल्लेवार केमन आयलंड ,  संगीता पालवेजी जर्मनीहून, तनुजा प्रधान अमेरिकेहून, तर वर्षा हळबे ह्युस्टन अमेरिकेहून. यांनी एकाहून एक छान उत्तम अश्या स्वतः च्या कवितांचे सादरीकरण केले. यांच्या कवितांचे विविधांगी कंगोरे विशद करण्यात समीक्षक तल्लीन झाले होते. या पाचपैकी चार कवयित्रींनी वृत्तबद्ध , गेय कविता अप्रतिम सादर केल्या. मराठी मातीशी नाळ जोडलेली असताना , विदेशातही मराठीची पताका अभिमानाने मिरवली जाते , हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले . कवितेचे सादरीकरण , कवितेचे व्याकरण , शब्द , अक्षर यांचे कंगोरे या सर्वांवर प्रा. सुनंदा पाटील यांनी मार्गदर्शन केले . त्यांनी आपली अप्रतिम गझल यावेळी सादर केली .


सूत्र संचालन अस्खलितपणे केले राखी जोशी व संजीव दिघे यांनी. तंत्र समन्वयक श्री . मिलिंद पगारे. ही त्रिमूर्ती म्हणजे साकव्य चे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेत.


अध्यक्ष स्थानावरून  माई अर्थात गझलनंदा सुनंदा जी पाटील मॅडम बोलत असताना ऐकतच राहावे असे वाटत होते. पुढील कवीकट्टा गझलेला समर्पित असेल . साकव्य संस्था अध्यक्ष श्री. पांडुरंग कुलकर्णी यांनी आयोजक काच्या भूमिकेतून ही माहिती दिली.

कार्यक्रमाची गुणवता दिवसेंदिवस खूपच छान होत चालली आहे हे निदर्शनास येत होते....


कार्यक्रम अध्यक्षा - प्रा. सुनंदा पाटील


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा