![]() |
विविध संस्थांचे प्रतिनिधी व मुलाखतीचे काही क्षण |
सांगली : आज रोजी सांगली शिक्षण संस्थेच्या, श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे बी.एड्. व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला प्लेसमेंट कॅम्प उत्साहात पार पडला. आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे या कँपमधून 90 % हून अधिक विद्यार्थ्यांची विविध शालेय संस्थांमार्फत निवडदेखील करण्यात आली.
या प्लेसमेंट कॅम्पसाठी अकुज इंग्लिश मेडियम स्कूल - कुपवाड, तक्षशीला स्कूल - सांगली, गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल - सांगली, स्कायलार्क इंग्लिश मेडियम स्कूल - सांगली, सिध्दी विनायक स्कूल - सांगली, सांगली शिक्षण संस्था - सांगली, इत्यादी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शैक्षणिक गुणवत्तेसाठी महाराष्ट्रात सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन हे महाविद्यालय प्रसिद्ध आहेच परंतु सोबतच विद्यार्थ्यांच्या रोजगाराची / नोकरीची शाश्वतीही आपले महाविद्यालय देते.
मा. प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे
महाविद्यालयातील उत्तम शिक्षणपद्धती व गुणवत्तेमुळेच विविध शिक्षणसंस्था या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड करण्यास प्राधान्य देतात. महाविद्यालयाने दिलेल्या उत्तम शिक्षण आणि करवून घेतलेल्या प्रात्यक्षिके व तयारीमुळेच आमची निवड झाल्याचे विद्यार्थी सांगतात. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
प्लेसमेंट कॅम्पचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बी. पी. मरजे यांच्या हस्ते करणेत आले. प्लेसमेंट कॅम्पचे समन्वयक, डॉ. युवराज पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्लेसमेंट कॅम्पसाठी महाविद्यालयाचे व्दितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा