Breaking

मंगळवार, २१ जून, २०२२

*जयसिंगपूरातील यशोदा मालू शिशुमंदिरात चिमुकल्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत*

 

यशोदा शिशु मंदिरात नवागतांचे स्वागत करताना मान्यवर


*गीता माने : सहसंपादक*


जयसिंगपूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती यशोदा मालू शिशुमंदिरात पूर्वगटातील नवागतांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी शालेय परिसरात आकर्षक रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली होती. आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना पेढे देण्यात आले. विद्यार्थी आणि पालक यांचे ढोल- ताश्यांच्या गजरात स्वागत करून वर्गात प्रवेश देण्यात आला. अत्यंत उत्तम पद्धतीने हा नवागतांचे स्वागत कार्यक्रम संपन्न झाला.

  या मंगलमय प्रसंगी मा.मुख्याध्यापक श्री.कोळी सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत जाधव, मा.मोबीन मुल्ला,सदस्य, पालक आणि सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

         शाळेच्या या प्रसन्न वातावरणात आनंदाच्या व समाधानाच्या प्रतिक्रिया पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात येत होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा