![]() |
दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना |
*जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी*
कोथळी : येथील सहारा इन्फोटेकचे संस्थापक मा.कासमअली फकीर सर नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम व विविध कोर्स राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून 2022 मध्ये यशस्वी झालेल्या दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा.विनायक निटवे यांनी विद्यार्थ्यांसमोर असणारा प्रचंड गोंधळाचा विषय म्हणजे, दहावीनंतर काय? या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या शंकांचे निराकरण त्यांनी यावेळी केले.
तसेच विद्यार्थ्यांनी विविध स्किल डेव्हलपमेन्ट कोर्सेस करावेत असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांसमोर असलेल्या दहावी नंतर काय या विषयाचे निराकरण केले. तसेच विनायक निटवे सर म्हणाले आपल्या गावातील सहारा इन्फोटेक मुळे MS-CIT, TALLY, TYPING यासारखे कॉम्प्युटर कोर्सेस आपल्या गावा मध्येच प्राप्त झाले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे ही आवाहन त्यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रमाचे उत्तम आयोजन कासमअली फकीर यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत श्रुती यादव हिने केले. तसेच प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय जीवन आवळे यांनी केले तर आभार इजाज शेख यांनी मानले.
या कार्यक्रमास लाभलेल्या अध्यक्ष कोथळी ग्रामपंचायतीचे सरपंच भरतेश खवाटे, मा.सरपंच ऋषभ पाटील,याकुब फकीर, शफिया फकीर, श्रीकांत अकीवाटे, कुमार सुतार, अशोक पुजारी, सुभाष इंगळे, अमोल चौगुले, सुदर्शन चूडाप्पा, निखिल शिरोटे, देवदत्त ठोंबरे अशोकअली फकीर, आलम फकीर, कृष्णात पुजारी यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा