Breaking

बुधवार, २९ जून, २०२२

*शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागात 'बी.एस्सी., एम.एस्सी. इकॉनॉमिक्स' हा पाच वर्षांचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू*

 

शिवाजी विद्यापीठात B.Sc. and M.sc.Economics 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


*अर्थशास्त्राचे सर्वांगीण ज्ञान देणारा राज्यातील पहिलाच अभ्यासक्रम*


कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात 'बी. एस्सी., एम.एस्सी. इकॉनॉमिक्स' हा पाच वर्षांचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्थशास्त्राचे सर्वांगीण ज्ञान देणारा राज्यातील पहिलाच अभ्यासक्रम आहे, अशी माहिती प्रा.डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी दिली.

     मुळात शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग हा सर्व बाबतीत परिपूर्ण असून  विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अध्यापन व संशोधन क्षेत्रात राज्यात किंबहुना देशातही नावलौकिक निर्माण केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२१  मध्ये विद्यापीठातील उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार प्राप्त करून शैक्षणिक व संशोधनात्मक गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे.या विभागात अत्यंत अनुभवी, देश-विदेशात नावलौकिक असणारे, समाजातील सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडवणूकीचे समाजोपयोगी संशोधन कार्य करून प्रस्ताव शासनास देणारे प्राध्यापक वृंद लाभलेले आहेत. अधिविभागात सर्व प्रकारच्या सुसज्ज व परिपूर्ण अशा सुविधा उपलब्ध आहेत.

विद्यापीठातील उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार प्राप्त

    अर्थशास्त्र विभागाने या नवीन  अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनाच्या, ज्ञानाच्या व वित्तीय सेवा क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी आहेत. याचा विचार करून हा नवा अभ्यासक्रम बनवला. यामध्ये पाच वर्षात अर्थशास्त्र आणि तत्सम विषयांशी निगडित सुमारे ६० पेपर अभ्यासक्रमात येणार आहेत. मॅथेमेटिक्स, स्टॅटिस्टिक, मॅथेमेटिकल इकॉनॉमेट्रिक्स व इकॉनॉमेट्रिक्स या विषयांचा अंतर्भाव आहेच. याशिवाय विद्यार्थ्यांना  कॉम्प्युटर प्रोग्रॅम बाबतही ज्ञान दिले जाणार आहे. इंग्रजी, फ्रेंच व जर्मन या भाषा शिकण्याची सुविधा असून, शाखाशी निगडित विषयही असल्याने व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित संधी विद्यार्थ्यांना  मिळतील. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बी.एस्सी. इकॉनॉमिक्स पदवी मिळेल. चार वर्षे पूर्ण केल्यावर इकॉनॉमिक्स ऑनर्स ही पदवी दिली जाईल. पाच वर्षे पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याकडे एम. एस्सी. पदव्युत्तर असेल, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रवेश मिळेल. अभियांत्रिकी डिप्लोमा केलेल्यांनाही प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी अर्थशास्त्र विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


💥 *प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ यांचे प्रतिपादन*

          बी. एस्सी, एम.एस्सी. इकॉनॉमिक्स हा पथदर्शी अभ्यासक्रम आहे. विस्तारणारे वित्तीय क्षेत्र, संशोधन आणि परदेशातील उपलब्ध संधी याचा विचार करून अभ्यासक्रमाची निर्मिती केली गेली आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच, नोकरी व व्यवसायाच्या संधी तसेच कॉर्पोरेट आणि संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्याचा आत्मविश्वास देईल.


🔴 *प्रा. डॉ. ज्ञानदेव तळुले यांचे आवाहन*

        अर्थशास्त्राचा संबंध सर्वच क्षेत्रांशी येतो. त्यामुळे अर्थशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्यांना करिअरच्या अनेक संधी असतात. औद्योगिक, वित्तीय, बँकिंग या सर्वच क्षेत्रांतील भविष्यातील संधी लक्षात घेऊन बी.एस्सी., एम.एस्सी इकॉमॉमिक्स हा पाच वर्षांचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम तयार केला आहे. अर्थशास्त्राचे मूलभूत ज्ञान, कॉर्पोरेट क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आणि तंत्रज्ञानाचा अवलंब या सर्वच गोष्टींचा समावेश या अभ्यासक्रमात आहे. 

     अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ही नामी सुवर्णसंधी बारावी उत्तीर्ण झालेल्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी निश्चितपणे आपलं करिअर घडवण्यासाठी याचा विचार करून लाभ घ्यावा असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 


अधिक संपर्कासाठी : (मो.नं. -97023 46977 दूरध्वनी क्र. ०२३१२६०९१८०  )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा