Breaking

गुरुवार, १६ जून, २०२२

जयसिंगपूरमध्ये चक्क नवऱ्याने मारल्या वडाला फेऱ्या


वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना रोहीत जाधव


*प्रा. अक्षय माने :  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


जयसिंगपूर :  समाजात अशी अख्यायिका आहे की सत्यवान याचा मृत्यू झाल्यावर सावित्रीने त्याला वडाच्या झाडाखाली झोपविले व यमराजाला सत्यवानाला पुन्हा जिवंत करण्याची याचना केली. व सत्यवान जिवंत झाला. तेव्हा पासून महिला आपल्या पतीला दिर्घ आयुष्य लाभो यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करुन पुजाअर्चा करतात.

   वटपौर्णिमेच्या दिवशी केवळ पत्नीनेच पुजा का करावी. त्यांच्या सोबत पतीने देखील पुजा केली पाहिजे. कारण पत्नी स्वतः चे जीवन पतीसाठी समर्पित करते तर निश्चितपणे पतीने देखील पत्नी सोबत वडाच्या झाडाची पुजाअर्चा करून पत्नी साठी काही तरी वरदान मागावे यासाठी आज चक्क कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील पत्रकार रोहित जाधव यांनी वडाला फेऱ्या मारून एक अनोखा विक्रम केला, नुकतेच यांचे एक महिना झाला लग्न होवून त्यामुळे आपल्या बायकोच्या आयुष्यासाठी त्यांनी वड पूजन केले, यावेळी अनेक महिला आणि मुली उपस्थित होत्या, या अनोख्या नवऱ्याला पाहून अनेक जणांनी कौतुकाचा वर्षाव केला आणि हे चित्र आपल्या मोबाईल मध्ये सर्वांनी टिपून घेतले.

        पुरोगामी विचाराचे पत्रकार रोहित जाधव यांचे कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा