![]() |
वटपौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व महिला |
*शशिकांत घाटगे : जांभळी प्रतिनिधी*
शिरोळ तालुक्यातील रचनात्मक कार्यात नावाजलेल्या आम्ही जांभळीकर महिला ग्रुपने ऑक्सीजन पार्क जांभळी येथे विधवा महिलांचे हस्ते आज वटपौर्णिमेनिमित्त वडाचे झाड लावून व पूजन करून वटपौर्णिमा साजरी केली.
आम्ही जांभळीकर ग्रुप हा वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन व विविध उपक्रम हाती घेत असतो. महिला ग्रुप देखील या कार्यात उत्साहाने सहभागी असतात. आज महिला ग्रुप ने ऐतिहासिक निर्णय घेऊन विधवा महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला. जांभळी ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव केला व त्याची अंमलबजावणी आम्ही जांभळीकर महिला ग्रुप सदस्य ग्रामपंचायत सदस्य जांभळी तील महिलावर्ग यांनी केला. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सौ. सोनाली मगदूम व्हाईस चेअरमन जे.जे. मगदूम शैक्षणिक संकुल व माजी नगरसेविका, सौ.नीलमताई माणगावे ज्येष्ठ कवीयत्री,लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या जयसिंगपूर या उपस्थित होत्या.
सौ.मगदूम यांनी विधवा महिलांना विधवा न म्हणता जसे सुवासिनींना अर्धांगिनी बोलले जाते तशाच पद्धतीने विधवा स्त्रियांना पूर्णागिंनी म्हणावे.तसेच ज्येष्ठ लेखिका नीलम ताई माणगावे यांनी विधवा महिलांचा सन्मान केला व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. महिला म्हणून महिलांचा सन्मान करणे अनिष्ट रूढी परंपरा यांना तिलांजली देणे कित्येक वर्षापूर्वी पासून विधवा महिलांचा सन्मान होण्यासाठी लोकांनी महिलांनी लढा दिला. विधवा महिलेकडे वाईट विकृतीने बघितले जाते त्यामुळे महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र आपली आभूषणे बिनधास्त घालावी. पति मरण्याच्या आधी पासून हळदी कुंकू लावली जातेच मग पती मरण पावल्यानंतर ते का लावायचे नाही महिलांनी तर हळदीकुंकू लाऊच नये व त्याचा अट्टाहास करू नये पुरोगामी विचाराने महिलांनी चालावे असे परखड मत मांडले.
आम्ही जांभळीकर महिला ग्रुपचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.सौ. मगदूम व सौ.नीलमताई यांच्या हस्ते वडाचे झाड लावण्यात आले.गृपच्या सदस्यांनी विधवा महिलांना हळदी कुंकू लावून ओटी भरून वडाच्या झाडाचे पूजन केले.विधवा महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले पति मरण पावल्यानंतर काय त्रास होतो पदोपदी त्याची जाणीव होते. आम्ही जांभळीकर महिला ग्रुपने हा वटपौर्णिमेचा उपक्रम साजरा करुन आम्हाला सन्मान देऊन ताठ मानेने जगण्यासाठी बळ दिले. तसेच जांभळी ग्रामस्थांनी ही प्रथा मोडीत काढण्यासाठी कार्यरत राहावे अशी विनंती केली तरी महिला ग्रुपने आम्ही कायम अशा पद्धतीने महिला म्हणून महिलांचा सन्मान करणार अशा भावना व्यक्त केल्या जांभळी येथील महिला तसेच परगावाहून देखील महिला ऑक्सिजन पार्क येथे वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा सण साजरा केला गेला.आम्ही जांभळीकर महिला ग्रुप ऑक्सीजन पार्क जांभळी ग्रामस्थ यांचे विधवा पुर्णांगिनी महिलांनी आभार मानले.आम्ही जांभळीकर ग्रुप महिला सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.
आम्ही जांभळीकर महिला ग्रुपच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा