Breaking

शुक्रवार, ३ जून, २०२२

*जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील तानाजी गुरव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती*

 

श्री. तानाजी गुरव यांची पीएसआय पदी निवड

*सौंदर्या पोवार : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर :  जयसिंगपुर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार श्री.तानाजी गुरव यांची  पी एस आय पदी पदोन्नती झाल्याने पोलीस खात्यात आनंद व्यक्त केला जात आहे. 

  श्री. गुरव यांनी अत्यंत प्रामाणिक व गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ३७ वर्षापासून पोलीस खात्यात काम करीत आहेत. त्यांनी गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून विशेष कामगिरी केली आहे. 

        जयसिंगपूर, शहापूर, गांधीनगर,हातकणगले व अन्य ठिकाणी त्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सिद्धार्थ दूध डेरी इचलकरंजी मधील झालेली एक कोटीची चोरी उघडकीस आणून कौतुकास्पद कामगिरी केली. तसेच त्यांना पोलिस खात्यात असताना दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन तर्फे गोवा या ठिकाणी २०१९  मध्ये सामाजिक राष्ट्रीय एकता गौरव पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत.अशी बरेच गुन्हे त्यांनी त्यांच्या या ३७ वर्षात कार्यकाळात उघडकीस आणून गुन्हेगाराला चाप बसवण्याची कामगिरी केली आहे.ते सध्या जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे गुन्हे शोध पथकामध्ये काम करीत आहेत. १ जून २०२२ रोजी त्यांची पीएसआय पदी निवड करण्यात आली. जयसिंगपुर पोलीस स्टेशनचे  पदाधिकारी,त्यांचे  मित्रपरिवार व नातेवाईकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिले.

     तानाजी गुरव सारख्या एका निर्भीड व  पोलीस खात्यातील आघाडीचे शिलेदार म्हणून ते कामगिरी करीत असतात. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर सामाजिक संवेदनशीलता जपत आपलं कर्तव्य पार पाडीत असतात. २४ तास सतर्क राहून लोकांची सेवा करण्यात त्यांना समाधान वाटते.त्यांच्या या पदोन्नतीने अनेक घटक सुखावले आहेत.

     जय हिंद न्यूज  नेटवर्क च्या वतीने मा. तानाजी गुरव यांचे मनस्वी अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा