✍🏼 मालोजीराव माने - कार्यकारी संपादक
सांगली : प्रतिभासंपन्न शिक्षक घडवण्याबरोबरच सामाजिक भान असलेला शिक्षक घडवण्याचा वसा घेतलेले कॉलेज म्हणजेच सांगली शिक्षण संस्थेचे श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन,सांगली हे कॉलेज होय. उद्या होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कॉलेजतर्फे हरिपूर रस्त्याच्या दुतर्फा चार किलोमीटरपर्यंतचा प्लास्टिक व इतर कचरा गोळा करत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
दरवर्षी येणाऱ्या पुरात या प्लास्टिक कचऱ्यामुळे गटारी, नाले तुंबली जातात व ते पाणी अडल्यामुळे पूरपरिस्थिती वाढते. याच कारणाचा शोध घेवून प्राचार्य प्रा.डॉ. बी.पी. मरजे यांनी २०१८ पासून या साफसफाईचा उपक्रम हाती घेतला. पावसाळ्याच्या आधी व पावसाळ्यानंतर हा साफसफाईचा उपक्रम आयोजित केला जातो.
फक्त प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून समस्या सुटणार नाही. तर हा कचराच निर्माणच होणार नाही हा दृष्टिकोन समाजात रुजवला पाहिजे. आणि असाच दृष्टिकोन बाळगणारे व पुढील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारे शिक्षक घडवण्याचा वसा आम्ही घेतला आहे.
प्रा.डॉ.बी.पी. मरजे
प्राचार्य, SPS कॉलेज सांगली.
या उपक्रमासाठी हरिपूर ग्रामपंचायत ने एक कचरा गाडी व तीन स्वच्छ्तादुत पुरवले. ज्यामधे शिवराज जाधव, संतोष केंचे व अनिता मोहिते या स्वच्छ्ता दुतांचा समावेश होता. या स्वच्छ्ता मोहिमेत जवळपास २ गाड्या प्लास्टिक गोळा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.युवराज पवार व प्राचार्य प्रा. डॉ. बी.पी. मरजे यांनी केले होते. उपक्रमात बी.एड प्रथम व द्वितीय वर्षाचे जवळपास शंभर विद्यार्थी सहभागी होते. आणि शिक्षकवर्ग प्रा.डॉ.सुशीलकुमार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, प्रा.दयानंद बोंदर, प्रा. गायत्री जाधव, प्रा. सुनील पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी संजय शेळके उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा