![]() |
शिरोळ रोटरी क्लबच्या वतीने पदग्रहण कार्यक्रम |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
शिरोळ : येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळचा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. रोटरीचे नुतन अध्यक्ष सचिन देशमुख, सचिव बाबुराव जाधव, ट्रेझरर अमित पंडीत यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी रोटरीचे ड्रिस्ट्रीक्ट सेक्रेटरी अरुण भंडारे होते. शिरोळच्या टारे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मावळते अध्यक्ष दिपक ढवळे यांनी केले. यावेळी गतवर्षातील विविध कार्यक्रमाचे व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. शिवाय, गतवर्षात क्लबला सहकार्य केलेल्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. नुतन पदाधिकाºयांबरोबर नवीन सदस्यांचा गौरवही यावेळी झाला. दहावी व बारावीतील गुणवंतांचा देखील सत्कार झाला.
ड्रिस्ट्रीक्ट सेक्रेटरी भंडारे म्हणाले, शिरोळ रोटरी क्लबने चौदा वर्षापुर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून चांगले काम केल्यामुळेच रोटरीचे नाव आहे. सकारात्मक विचार ठेवून केवळ अध्यक्ष, सचिव यांच्यापुरते मर्यादित न राहता सर्व सदस्यांनी एकत्र येवून काम केले तरच रोटरीची संकल्पना पूर्णत्वास येणार आहे. यावेळी माजी असिंस्टंट गर्व्हनर रुस्तुम मुजावर, असिंस्टंट गर्व्हनर अन्सार चौगुले, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. सुत्रसंचालन चिंतामणी गोंदकर यांनी केले. बाबुराव जाधव यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा