![]() |
कृष्णा-पंचगंगा सेवा फाउंडेशन |
प्रा.चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी
जयसिंगपूर : दरवर्षी प्रमाणे शिरोळ तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते हे सांगता येत नाही. या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि पूरग्रस्त गोर - गरीब नागरिकांची गैरसोय होऊ नये. सर्व पूरग्रस्त नागरिक व जनावरे सुरक्षित राहावेत या हेतूने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कृष्णा-पंचगंगा सेवा फौंडेशन तर्फे "मा. आमदार श्रीमंतीबाई दुग्गे-कलंत्रे अक्का पूरग्रस्त निवारा केंद्र" चालू केले आहे.
हे निवारा केंद्र लठठे एज्युकेशन सोसायटी,सांगली यांच्या अंतर्गत चालू असलेल्या गंगाबाई खिवराज घोडवत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर ( झेले कॉलेज शेजारी ) येथे चालू केले आहे. या निवारा केंद्रा मध्ये पूरग्रस्त लोकांना आपल्या फौंडेशन तर्फे दोन वेळेचे जेवण, नाष्टा, जनावरांसाठी चारा, पशु खाद्य, आरोग्य सुविधा, शौचालये,सर्व शासकीय आपत्कालीन सुविधा इत्यादीची सोय विनामूल्य करण्यात येणार आहे. पूरग्रस्त नागरिकांनी घाबरून,गोंधळून जाऊ नये आणि जनावरे व त्यांचे मालक एकत्र राहतील या उद्देशाने निवारा केंद्र चालू करण्यात आले आहे. हे केंद्र विनामूल्य असल्यामुळे सर्व दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष प्रसाद दुग्गे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा