Breaking

गुरुवार, २१ जुलै, २०२२

*इचलकरंजीतील सामान्य कुटुंबातील अशोक पवार यांच्याकडून जयसिंगपूरात प्रामाणिकतेची दर्शन व प्रेरणा*


अशोक पवारांचा जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मान होताना 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : शहरातील गांधी चौक या ठिकाणी सुधीर महादेव मगदूम रा.गडमुडशिंगी यांची सव्वा तोळ्याची चेन गळ्यामधून पडली होती. सदरची चेनही गांधी चौक या ठिकाणी चप्पल बूट पोलीस काम करणारे अशोक नारायण पवार रा.इचलकरंजी थोरात चौक यांना सापडली होती. सदरची  सापडल्यानंतर त्यांनी राजेंद्र नांद्रेकर तसेच पोलीस ठाणेस चेन सापडले बाबत माहिती कळविली होती.

    त्यानंतर सुधीर महादेव मगदूम यांनी सदर चेन आपली असले बाबत सांगितले त्याबाबत सीसीटीव्ही फुटेज पाहून खात्री करण्यात आली असता सदरची चेन त्यांचीच असले बाबत  खात्री झाल्याने सदरची चेन त्यांना परत देण्यात आली.

   सध्याच्या स्वार्थी व आत्मकेंद्रीत असलेल्या बेगडी जगामध्ये  सामान्य कुटुंबात जीवन जगणारे अशोक नारायण पवार यांनी सदरचा जिन्नस परत करून सामान्यातून असामान्य कार्य करीत प्रामाणिकतेचे दर्शन घडवून आणले आहे.  त्यांचा प्रामाणिक कार्याची दखल घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के, जयसिंगपूरचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नांद्रेकर ,राहुल झेले व रोहित मालवेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

       या जगात निस्वार्थी भावनेने जगणारी मंडळी सन्माननीय अशोक पवार यांच्या रूपात दिसून येत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक कार्याला जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने सलाम!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा