Breaking

मंगळवार, ५ जुलै, २०२२

*शिवाजी विद्यापीठ निवडणुकीच्या ऑनलाईन मतदार नोंदणीस मुदतवाढ*


शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर निवडणूक 2022

प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर, दि. ४ जुलै २०२२ : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेच्या प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, नोंदणीकृत पदवीधर आणि शिक्षक तसेच विद्यापरिषदेमध्ये निवडून द्यावयाचे आठ शिक्षक, आणि अभ्यास मंडळासाठी निवडून द्यावयाचे विभागप्रमुख यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत दिनांक ७ जुलै २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आज दिनांक ४ जुलै २०२२ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत २९१२८ नोंदणीकृत पदवीधरांनी, १८१ महाविद्यालयांच्या शिक्षकांची, १७० महाविद्यालयांच्या विभागप्रमुखांचा, १०० महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आणि ९९ व्यवस्थापन प्रतिनिधींची ऑनलाईन नोंदणी प्राप्त झाली आहे.

  अधिकाधिक मतदारांना नोंदणी करता यावी यासाठी ही मुदत सात दिवसांसाठी वाढविण्यात आली होती. त्यासाठी कोणीही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधितांनी घेवून दिनांक ७ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरून, सदर ऑनलाईन भरलेली माहिती/अर्ज आवश्यक कागदपत्रासह विद्यापीठ कार्यालयाकडे दिनांक ११ जुलै, २०२२ रोजी सांयकाळी ०६.००  वाजेपर्यंत हार्ड कॉपी स्वरूपात जमा करावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा