![]() |
इलेक्ट्रिक थ्री व्हीलर ची निर्मिती |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : महाराष्ट्रातील नावाजलेली शैक्षणिक संस्था अर्थात अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज ,जयसिंगपूर येथील बी.व्होक ऑटोमोबाईल मध्ये तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा इलेक्ट्रिक र्थ्री व्हीलरची निर्मिती करून नवोपक्रमशीलतेला चालना दिली.
स्किल इंडिया(skill India) अंतर्गत असलेल्या या कोर्सच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टचा भाग म्हणून अतिशय उत्कृष्ट थ्री व्हीलर निर्मितीची कामगिरी केली आहे.
या थ्री व्हीलर प्रोजेक्ट साठी विद्यार्थ्यांनी 48 volt ची बॅटरी व hub motor wheel वापरली असून सिंगल चार्ज मधे ही बाईक अधिकतम 45 या स्पीडने 40 km चे अंतर विनासायास सहजतेने गाठते.सदर इलेक्ट्रिकल थ्री व्हीलर बाईक साठी ₹ 25,000 खर्च आला आहे. या अनोख्या थ्री व्हीलर गाडीच्या निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिरोळ तालुका विशेष करून जयसिंगपूर शहर व परिसरातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट थ्री व्हीलर गाडीच्या निर्मितीसाठी B.voc. विभागाचे समन्वयक प्रा.एस.एस. गिरमल, प्रा.एस.एस.पंडित आणि प्रा.ए.आर.पाटील यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
यासाठी कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे,सचिव डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार मा. पद्माकर पाटील व संस्थेचे सर्व मान्यवर सदस्य , कॉलेजचे प्र.प्राचार्य प्रा.डॉ.सौ.मनिषा काळे व कार्यालयीन अधीक्षक संजीव मगदूम यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कॉलेजच्या सर्व घटकांकडून कौतुक केले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी बी.व्होक. ऑटोमोबाईल या कोर्ससाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून उत्तम करिअर या रूपाने निवडावे असे आवाहन प्रा. एस.एस.गिरमल यांनी केले आहे.
■ प्रवेशासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
https://prnt.sc/fCdUFzR_5cpT
⚫ अधिक माहितीसाठी संपर्क : 7507110016
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा