![]() |
सुप्रसिद्ध सिने अभिनेते मा.सयाजी शिंदे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर व्हायचं असेल तर पैसे मिळवून देणाऱ्या योजनेच्या पाठीमागे लागण्यापेक्षा पैसे मिळवून देणाऱ्या झाडांचा प्रोजेक्ट राबविणे गरजेचे आहे. स्वतः सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व गावातील समविचारी गावकरी, संवेदनशील मंडळे, शाळेतील विद्यार्थी, एन.सी.सी.(NCC),राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी (NSS) यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करून गाव आत्मनिर्भर बनू शकते. हे सर्व करीत असताना राजकारण व स्वार्थ विरहित काम करावे. या माध्यमातून ग्रामपंचायतीला दहा वर्षांनी दहा लाख रुपये मिळू शकतात.
मा.सयाजी शिंदे यांनी यासाठी फळांच्या व फुलांचा कृती आराखडा सांगितला.
१) गावात किमान अ) १०० जांभूळ ब) १०० चिंच क) १०० आवळा या फळझाडांचे वृक्षारोपण करावे.
२) पिवळ्या चाफ्याची १००० रोपे लावून उत्पन्न मिळवू शकता.
३) यासाठी गावातील सर्व घटकांचे वाढदिवस साजरे करा आणि वाढदिवसानिमित्त फळांची झाडे लावा.
४) स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी गावातील सेवानिवृत्त सेनाधिकारी व सैनिक यांचा उचित सन्मान करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करावे.
५) ७५ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नातवाने किंवा मुलांनी फळांची झाडे लावावीत.
आपली ग्रामपंचायत आत्मनिर्भर बनविण्यासाठी निसर्गच आपल्याला तारू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी वृक्षारोपण करावे असे आवाहन सुप्रसिद्ध सिनेअभिनेते व संवेदनशील व्यक्तिमत्व सयाजी शिंदे यांनी केले आहे. आपल्याला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर ८०८०४०९०४० या नंबर वर संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा