![]() |
मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठा रॅलीचे आयोजन |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
कोल्हापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे आज ६२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. संपूर्ण राज्यात त्यांचा वाढदिवस शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जात आहे.बाळासाहेबांच्या माघारी शिवसेना समर्थपणे सांभाळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात राज्यातील जनतेसाठी जीवाची बाजी लावून अहोरात्र पणे काम केले. यामध्ये त्यांचा मुख्यमंत्री पदाचा निम्मा कालावधी संपला असताना उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मोठे आव्हान ठाकले आहे. संकटात असलेल्या उद्धव ठाकरे यांना प्रेम दाखवून देण्यासाठी शिवसैनिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे.कोल्हापूर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले शक्तीप्रदर्शन करीत नेते जरी बाजूला झाले असले तरी आम्ही लढण्यासाठी कमी नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांसह महिलांचाही उस्फूर्तपणे निष्ठा यात्रेत सहभाग दिसून आला. फटाक्यांची आतषबाजी तसेच शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी यावेळी परिसर दणाणून सोडला. दसरा चौकातून या रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी शिवसैनिकांनी 'उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले व सुनील मोदी यांनी रॅलीचे नेतृत्व केले.
या रॅली दरम्यान मा.उद्धव ठाकरे यांचे विषयी भावनिक व सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा