L
![]() |
सुटाचे सहसंचालक,उशि(कोल्हापूर) कार्यालयासमोर धरणे आंदोलन |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (एमफुक्टो) च्या वतीन विविध न्याय- हक्क मागण्यांसाठी दि.१५ मे, २०२२ पासून अविरतपणे आंदोलन सुरू आहे. या अगोदर सोमवार दि.१८ जुलै,२०२२ रोजी पुणेच्या उच्च शिक्षण, संचालक कार्यालयासमोर राज्यस्तरीय मोर्चा/धरणे आंदोलन यशस्वी झाले आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध प्राध्यापक संघटनांनी सक्रियपणे सहभाग नोंदविला होता.या पुढील आंदोलनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून महाराष्ट्रातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिवाजी युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात सुटाचे कोल्हापुरातील उशि विभागीय सहसंचालक, कार्यालयासमोर धरणे आंदोलन सोमवार दि .१ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.३.०० ते ५.०० या वेळेत आयोजित केलेले आहे. इतर आंदोलना प्रमाणे हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातून किमान ४ प्राध्यापक उपस्थित राहवेत. आपल्या न्याय्य मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर जास्तीत जास्त प्राध्यापकांची उपस्थिती आवश्यक असून त्यानुसार आपण प्राध्यापकांच्या उपस्थितीचे नियोजन करावे असे आवाहन सुटाचे अध्यक्ष डॉ.आर.के. चव्हाण व सुटाचे कार्यवाह डॉ. डी.एन.पाटील यांनी केलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा