*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
जयसिंगपूर : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विनाअट प्रोत्साहन पर ५० हजार अनुदान द्या. तसेच उसाचा दुसरा हप्ता रुपये व रासायनिक खतांचे दरवाढ त्वरित मागे घ्या अशा जन मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवार दि.१३ जुलै,२०२२ रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या न्याय व हक्कासाठी संघर्षाची लढाई सुरू असते. पुन्हा शेतकरी बांधवांच्या न्यायाच्या व हक्काच्या संघर्षाची लढाई जिंकण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान होणाऱ्या मोर्चात शेतकरी बंधू-भगिनींनो हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा