![]() |
शिरोळच्या रोटरी क्लबच्या वतीने मोफत नेत्र तपासणी |
*ओंकार पाटील : शिरोळ प्रतिनिधी*
शिरोळ : येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरात १०१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १८ रुग्णांचे निदान झाले. सात जणांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. गावडे गल्ली हनुमान मंदिर सभागृहात या शिबीराचे उद्घाटन महादेव बिसुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष सचिन देशमुख, दिपक ढवळे, पंडीत काळे, श्रीकांत शिरगुप्पे, अविनाश टारे, सचिव बाबुराव जाधव, युवराज जाधव यांच्यासह सदस्य उपस्थित होते. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला. २० जणांना चष्म्यांचे वाटप देखील झाले.
रोटरी क्लब ऑफ शिरोळच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा