![]() |
कारगिल युद्धात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना माजी सैनिक |
संजय सनदी : टाकळीवाडी प्रतिनिधी
टाकळीवाडी : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे २६जुलै,२०२२ रोजी कारगिल युद्धात(विजय दिन)शहीद झालेल्या भारतीय जवानांना सैनिक वेल्फेअर असोसिएशन तर्फे जिल्हा आदरांजली वाहण्यात आली.
सन १९७१च्या युद्धात सामील झालेले माजी सैनिक मा.श्री.वसंत बिरणगे व माजी सैनिक मा.श्री.पांडुरंग निर्मळे यांच्या हस्ते कुमार विद्यामंदिर येथे वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कुमार विद्यामंदिर येथे माजी ऑर्डीनरी कॅप्टन मा.रमेश निर्मळे,माजी सुभेदार मा.केंदबा कांबळे यांनी कारगिल युद्धाची सविस्तर व प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी टाकळीवाडी गावातील सर्व माजी सैनिक उपस्थितीत होते. दादा खोत, लक्ष्मण निर्मळे,गोपाल निर्मळे,नंदू कांबळे , बळीराम कांबळे,तसेच शाळेचे मुख्याध्यापक मा.धोंडीराम बाबर,सर्व शिक्षक,शाळेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
माजी सैनिकाकडून कारगिल युद्धाच्या माहितीद्वारे देशाभिमान व जाज्वल्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम हे यानिमित्ताने करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा