Breaking

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

*जयसिंगपूरच्या मालू हायस्कूल मध्ये वीर पत्नी श्रीमती सुलाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*


वीर पत्नीच्या हस्ते मालू हायस्कूल मध्ये ध्वजारोहण संपन्न


*सौ. गीता माने : सहसंपादक*


जयसिंगपूर  : १५ ऑगस्ट २०२२  रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या प्रांगणात सैनिक टाकळी येथील वीर पत्नी श्रीमती सुलाताई रावसाहेब पाटील यांचे शुभ हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यांचे पती शहीद जवान वीर रावसाहेब पाटील हे शांतिसेना श्रीलंका येथे २९ नोव्हेंबर १९८७ रोजी ऑपरेशन 'पवन' राबविताना लढताना शहीद झाले.

      श्रीमती पाटील ह्या आपल्या मनोगतामध्ये आमच्या घरातील तीन पिढ्या सैन्यात असल्याचा आम्हास अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या. मुलांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालू हायस्कूलचे चेअरमन मा राजेंद्र मालू हे होते. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.मनोगतामध्ये तिरंगा मधील तीन रंगाचे व अशोक चक्राचे महत्व सांगितले .आपला देश शेतीप्रधान आहे .नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत असल्याचे अनेक दाखले दिले.

   कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. सौ. अर्चना राजेंद्र मालू यांची होती. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ. अर्चना मालू यांच्या शुभहस्ते करण्यात आला.  

    NCC,RSP कॅडेट यांच्या संचलनाने पाहुण्यांना मानवंदना दिली.याचे नियोजन श्री.एस.एच.भोसले व श्री.एस .व्ही. हजारे यांनी केले. NCC च्या ८ विद्यार्थ्यांना कॅडेट वेल्फेअर सोसायटी मार्फत मुलांना शिष्यवृत्तीचे चेक वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

   कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.आर. आय.पोवार सर यांनी केले .पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक श्री संजय सुतार व आभार पर्यवेक्षक श्री.आर. जी. देशपांडे यांनी मानले.सूत्रसंचालन सौ.ए. के.भिलवडे व सौ.व्ही.एस.शिंदे यांनी केले.

     कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य मा.प्रसन्न कुंभोजकर ,मा चंद्रकांत जाधव ,नंदकिशोर मालू, संजय मालू ,सौ अनुसया मालू ,श्री एस.पी .कोळी, सौ रुपाली पाटील, पंकज पाटील, सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी ,पालक  ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा