![]() |
स्वातंत्र्य दिन भाषण करताना ख्रिस्ती मंडळी |
*सौ.गीता माने : सहसंपादक*
जयसिंगपूर : सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमे अंतर्गत व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२- यावर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाले असून त्यानिमित्त जयसिंगपूर येथील जयसिंगपूर ख्रिस्ती मंडळी, जयसिंगपूर यांच्या वतीने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रीय सण म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी सकाळी जयसिंगपूर येथील पोलीस उप निरीक्षक स्नेहल दीपक टकले मॅडम यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते वृक्ष रोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जॉन सकटे याच्या वतीने त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मॅडमनी 'हर घर तिरंगा' मोहिमे बाबत मागदर्शन दिले. कश्या प्रकारे भारतीय ध्वज फडकावयाचा व कश्या प्रकारे काळजी घ्यायची व तिरंगेचा महत्व त्यांनी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी मंडळींचे सेक्रेटरी साकीन आठवते, खजिनदार अजय लोखंडे, मधुकर ढाले, सुधीर ढाले, राजू स्टॅनली अविनाश आवळे, शमशोन सकते हे उपस्थित होते. यांचा सत्कार जयसिंगपूर ख्रिस्ती मंडळी चे तरुण मुलांकडून करण्यात आला. तसेच तरुण मंडळ, महिला मंडळ, लहान मुले उपस्थित होते. या वेळी संडे स्कूलचा विद्यार्थी अनोश ढाले यांनी इंग्रजी मध्ये भगतसिंग यांच्यावर स्पीच म्हणून दाखवले.
यानंतर जयसिंगपूर मंडळीचे पाळकसाहेब अप्पासाहेब मिरजकर यांनी मॅडम चे व उपस्थितांचे आभार मांडले व शेवटची प्रार्थना घेऊन उपस्थितांना आशीर्वाद दिला. तसेच उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
त्यांनतर दुसऱ्या दिवशी रविवार दिनाक १४/०८/२०२२ रोजी डॉ.एम के.लोखंडे मेमोरियल जयसिंगपूर च्या परिसरात रविवारची लौकीक उपासना झाल्या नंतर वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्यावेळी जयसिंगपूर ख्रिस्ती मंडळी मधील सर्व महिलाच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. सर्वानी उत्साहाने परिसरात झाडे लावण्यात सहभाग घेतला. त्यावेळी मंडळी तर्फे जिलेबी वाटप करण्यात आले. यावेळी चर्च सभासद प्रदीप ढाले यांना या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले याबद्दल व मंडळीचे माळी आशीष घाटगे यांना उत्तम कार्याबद्दल पुष्प गुच्छ देऊन गौरवन्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी सुरवातीची प्रार्थना प्रीती ढाले यांनी घेऊन ध्वजारोहण कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी मंडळीचे पाळक साहेब व अप्पासाहेब मिरजकर यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडण्यात आला. त्या नंतर चर्च सेक्रटरी यांनी सर्वांचे आभार मांडले. विशेष तरुण मुलांचे पण कार्यक्रम व्यवस्थित पार पडला याबाद्दल आभार व्यक्त केले. यावेळी अनोश ढाले, स्तवन ढाले तसेच अविशा आठवले या मुलांनी स्पीच म्हणून दाखविले या नंतर मंडळी तर्फे खाऊ वाटप व चहापाण चा कार्यक्रम झाला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२ राष्ट्रीय सण अतिशय उत्साहवर्धक, सामाजिक जाणीव जोपासून आणि आनंदा मध्ये झाला देव बापाने सर्व कार्यक्रम आशीर्वादित पार पाडला त्या बद्दल देवाचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा