Breaking

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये स्वराज्य महोत्सवांतर्गत समुह राष्ट्रगीत गायन संपन्न*


जयसिंगपूर कॉलेज मध्ये समुह राष्ट्रगीत गायन


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव" अर्थात "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरु राहणाऱ्या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम विविध पातळीवर आयोजित करण्यात आले. यामध्ये जयसिंगपूर कॉलेजने सक्रिय सहभाग नोंदविला.

    राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन सुरु आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये राज्यात "स्वराज्य महोत्सव" चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “स्वराज्य महोत्सव" अंतर्गत राज्यस्तर / जिल्हास्तर / तालुकास्तर व ग्रामस्तरावर आयोजित करावयाच्या कार्यक्रम / उपक्रम यांचे स्वरुप निश्चित केले होते. "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत राज्यस्तरावरील कार्यक्रमांच्या नियोजनामधील “समूह राष्ट्रगीत गायन" हा उपक्रम दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता जयसिंगपूर कॉलेज मध्ये संपन्न झाला.

   सकाळी ठीक ११:०० वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात झाली आणि सकाळी ११:०० ते ११:०१ या एका मिनिटांमध्ये समूह राष्ट्रगीत गायन संपन्न झाले. 

    या समुह राष्ट्रगीत गायनासाठी महाविद्यालयातील प्र.प्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत, उपप्राचार्य प्रा. डॉ. एन.एल.कदम,प्रा.डॉ. मनिषा काळे,प्रा. सौ.एम.एस. पाटील प्रा.बी.ए.आलदर ,कार्यालयीन अधीक्षक संजीव मगदूम,संजय चावरे, एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने व डॉ. के.डी.खळदकर, एनसीसी प्रमुख प्रा. सुशांत पाटील, प्रशासकीय कर्मचारी व सेवक वर्ग त्याचबरोबर सर्व शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनिल चौगुले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा