![]() |
शाहूवाडी तालुक्यातील शाळेत खाऊ व वस्तूंचे वाटप |
*नामदेव निर्मळे : टाकळीवाडी प्रतिनिधी*
टाकळीवाडी : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावातील संवेदनशील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यातील शेभवणे (नवलाईदेवी) या दुर्गम भागातील शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले. यामध्ये आनंद उन्हाळे, नितेश वनकोरे ,नितीन लोहार, निलेश वनकोरे ,अक्षय पाटील ,ओंकार पाटील ,निशांत गोरे, आकाश निर्मळे, गणेश निर्मळे ,दिनेश निर्मळे, धनाजी अपराध हे नागरिक होते.
शाळेतील पहिली ते पाचवी पर्यंत २६ विद्यार्थी व अंगणवाडीमध्ये १६ विद्यार्थी आहेत. यावेळी गावातील मा.सरपंच, तलाठी' नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.
विशेष म्हणजे सदर शाळा एक शिक्षकी असून टाकळीवाडीच्या नागरिकांनी दाखविलेल्या सामाजिक संवेदनशीलते बद्दल नागरिकाकडून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा