Breaking

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

*जयसिंगपूरच्या ब्रह्मा कुमारी सेवा केंद्राच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन ; स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद*


ब्रह्माकुमारी केंद्रांमध्ये जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन : ब्रह्माकुमारी राणी बहेनजी 


*सौ. गीता माने  : सहसंपादक*


जयसिंगपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व कल्पतरु (वृक्षारोपण) प्रोजेक्ट अंतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धाचे, २०२२ आयोजन करण्यात आले होते.

      ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातील प्रमुख ब्रह्माकुमारी राणी बहेन जी , ब्रह्मकुमार उत्तम भाई जी यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर केंद्राच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रमाचं वर्षभर आयोजन करण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांच्या कलेला संधी देण्यासाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते.   

      सदर स्पर्धा  गट अ - १ ते ४ थी : माझी शाळा/ माझा आवडता खेळ/ वृक्ष माझे मित्र, गट ब - ५ वी ते ७ वी : रस्त्यावरील सुरक्षितता/आम्ही पावसात खेळतो आहोत/आठवडी बाजार , गट क ८ वी ते १० वी : पर्यावरण वाचवा/ देश वाचवा/ ऐतिहासिक प्रसंग/ शेतात काम करीत असलेले कुटुंब/ भारतीय सण या महत्वाच्या सामाजिक व पर्यावरणात्मक विषयाच्या अनुषंगाने स्पर्धेचे भव्यदिव्य पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

     सदर स्पर्धेमध्ये जवळपास १००० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेचा निकाल दि.१५ ऑगस्ट रोजी ,२०२२ रोजी विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या  स्पर्धेचे आयोजनामध्ये किणीकर सर,सुनील ठोमके व अनेक घटकांनी मदत केली.

     या केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी राणी बहेन जी यांनी आवाहन केले आहे की, या केंद्राच्या माध्यमातून अध्यात्मिक शांती, मनाची एकाग्रता व परिपूर्ण व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी नागरिकांनी या केंद्राला भेट देऊन आपला आयुष्य शिवमय, सुखमय व आनंदमय करावे. या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा