Breaking

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

श्रीमती पुतलाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली आणि भारत विकास परिषद शाखा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान, नेत्रदान आणि देहदान मार्गदर्शन शिबिर

 




        सांगली :  आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आज श्रीमती पुतलाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली आणि भारत विकास परिषद शाखा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान, नेत्रदान आणि देहदान मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी डॉ विलास जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ.विलास जोशी मार्गदर्शन करताना


      यावेळी डॉ.विलास जोशी यांनी रक्तदान, नेत्रदान आणि देहदानाबद्दल अत्यंत महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. जसे  अवयव दान करण्यासाठी आधी त्याचा फॉर्म भरावा लागतो, जरी ऐनवेळेस अवयव दान करण्याचा निर्णय झाल्यास मृत्यू झाल्यानंतर ६ तासापर्यंत ते अवयव उपयोगी असतात त्यामुळे त्या वेळेत संस्थेला कळवणे गरजेचे असते. आणि विशेष म्हणजे या अवयव दानाचे प्रबोधन आपल्या सर्वांना करायचे आहे. हीच खरी देशसेवा ठरेल असे प्रतिपादन डॉ. विलास जोशी यांनी केले.


नेत्रदान : वयाचे एक वर्ष पूर्ण झाल्यापासून नेत्रदान करता येते. व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर घ्यावयाची काळजी - डोळे कोरडे पडू नये याची काळजी घ्यावी त्यासाठी मृतशरीरास फॅन खाली ठेवू नये, डोळ्यांवर गार पाण्याची पट्टी ठेवावी.


रक्तदान : सर्वसाधारणपणे तीन महिन्यांच्या कालांतराणे रक्तदान करावे. रक्तदान केल्यानंतर ४८ तासात शरीर पुन्हा रक्त निर्माण करते. रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्त ( RBC) तयार झाल्याने व्यक्ती विविध व्याधीपासून दूर राहतो. सोशल मीडियावर आपण दान केलेलं रक्त टाकून देणारे फोटो/ व्हिडिओ व्हायरल होतात व रक्तदानाचा फायदा नसून रक्तदान करू नये असा चुकीचा संदेश पसरवला जातो - अशा अफवांना बळी पडू नये. आपण दान केलेलं रक्त जर कोणाशी मॅच होत नसेल किंवा त्यात काही खराबी असेल तरच त्याचा वापर होत नाही व ते टाकून द्यावं लागत.


शरीर दान : दान केलेल्या शरीराचा उपयोग वैद्यक शास्त्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होतो, तसेच शस्त्रक्रिया विशेषज्ञ या शरीरावर शस्त्रक्रियेचा अभ्यास करतात. याचा उपयोग जिवंत मानवाचा उपचार करण्यासाठीच होतो. 


     या सर्व अवयव दानामुळे कोना गरजू व्यक्तीला नवी दृष्टी नवे जीवन मिळू शकते, हे भूतलावरील सर्वात मोठे आणि श्रेष्ठ दान आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य. बी.पी मरजे सर 
      
       कॉलेजचे प्राचार्य बी. पी मरजे यांनी रक्तदान नेत्रदान आणि देहदान का आणि कशासाठी करावे आणि यासाठी आपली सामाजिक बांधिलकी आहे असे मत मांडले आहे.

       या शिबीरासाठी कॉलेज मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. तसेच शाखा सचिव सौ शिल्पा कुलकर्णी . सह सचिव सौ. वैदेही जोशी आणि सदस्य डॉ बी पी मरजे सर. श्री शिरीष कुलकर्णी. व इतर सदस्य उपस्थित होते.  अतिशय सुरेख आणि सखोल मार्गदर्शन डॉ विलास जोशी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा