![]() |
कवडसा फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर |
*जयसिंगपुरात कवडसा फाउंडेशनच्या रक्तदान शिबिर संपन्न
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील कवडसा फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. याच पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून जयसिंगपूर कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध धन्वंतरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. महावीर अक्कोळे, प्रमुख उपस्थितीत जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ. नितीश सावंत होते.
कवडसा फौंडेशनकडून (फॉर्च्यून शहा) रुग्ण सेवा साहित्य केंद्राच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी अविरतपणे कार्य सुरू आहे. त्याचबरोबर सध्या रुग्णांना रक्ताची नितांत आवश्यकता असून यासाठी ऑगस्ट क्रांती दिनी जयसिंगपूरातील संत सेना महाराज मंदिर, शाहूनगर याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये ४८ रक्तदात्यांनी अत्यंत मनोभावे व आनंदाने रक्तदान केले.
या शिबिराचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक डॉ.सुभाष अडदंडे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. ते म्हणाले की, कवडसा फाउंडेशन संस्थेचे कार्य समाजोपयोगी असून रुग्णांची गरज पाहून त्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदात्यांनी केलेले कार्य उदात्त व मानवतावादी असल्याचे ते म्हणाले.
कवडसा फाउंडेशनचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध धन्वंतरी मा.डॉ.महावीर अक्कोळे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, जयसिंगपूर शहरातील नागरिक हे सामाजिकदृष्टया संवेदनशील असून बांधिलकी जपण्याचे कार्य करतात. त्यामुळे अशा रक्तदान शिबिराला त्यांचा भरभरून पाठिंबा मिळत असल्याने ते कौतुकास पात्र असल्याबाबत ते बोलले. जयसिंगपूर कॉलेजचे नूतन प्राचार्य प्रा.डॉ. नितीश सावंत व मा.खंडेराव हेरवाडे यांचा कवडसाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.बाळगोंडा पाटील,आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष बंडू उर्फ शुक्राचार्य ऊरणकर यांनी केले.तर या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या शिबिरास सामाजिक चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते व प्रसिद्ध रक्तदाते खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे, प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. बाणदार,डॉ.गाणबावले, सुनील वायचळ, माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके, सागर माने, अमित माणगांवे,शाहूनगर मधील असंख्य रक्तदाते व जयसिंगपूरचा क्रांती ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराचे उत्तम नियोजन कवडसा फाउंडेशनचे पदाधिकारी अध्यक्ष बंडू उर्फ शुक्राचार्य ऊरणकर,प्रा.बाळगोंडा पाटील, सुरेश पुकाळे, शितल चव्हाण व प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी उत्तम पद्धतीने केले.
सिद्धिविनायक ब्लड बँक, मिरज डॉ.जितेंद्र पत्की व आधार ब्लड बँक,सांगली डॉ. टकले, डॉ. मोरे व त्यांचे सर्व सहकारी स्टाफ चे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा