![]() |
पद्मर्षी एस.आर.रंगनाथन |
सांगली : दरवर्षी 12 ऑगस्ट हा पद्मश्री डॉ. एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे दरवर्षी हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे प्र.के.अत्रे यांच्या 125व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांकडून 'अध्यापक अत्रे' या पुस्तकावर परिसंवाद व चर्चासत्र घेण्यात आले.
![]() |
ग्रंथ प्रदर्शनातील काही क्षण |
कार्यक्रमात पद्मश्री रंगनाथन आणि प्र.के.अत्रे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. ग्रंथालय आणि व्यवस्थापन यासंदर्भात केलेल्या बहुमोलाच्या कार्याबद्दल पद्मर्षी एस.आर. रंगनाथन यांचा गौरव म्हणून हा ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. एक तज्ञ गणित शिक्षक असणाऱ्या रंगनाथन यांनी प्राध्यापकाचा पेशा सोडून ग्रंथपालाचा पेशा स्वीकारला कारण त्यांना ग्रंथाबद्दल खूप आवड होती. त्यांनी सर्वसामान्यांना ग्रंथालयाची दरवाजे खुली केली, सार्वजनिक ग्रंथालय हीसुद्धा त्यांचीच देणगी आहे. अशी माहिती विद्यार्थी हर्षवर्धन सावंत यांनी प्रास्ताविकेमध्ये दिली.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे प्र.के.अत्रे यांच्या १२५व्या जयंती निमित्त अध्यापक अत्रे या पुस्तकावर परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे माननीय प्राचार्य डॉ. बी.पी. मरजे होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सौ.संध्या यादव, ग्रंथपाल यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. यावेळी प्रो.डॉ. सुशील कुमार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.युवराज पवार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, प्रा.दयानंद बोंदर, प्रा.गायत्री जाधव, प्रा. व्ही.पी. गायकवाड, प्रा.एम.आर.पाटील, ग्रंथपाल सहायक नार्वेकर आणि बी.एड. प्रथम वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा