![]() |
ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्र. प्राचार्य डॉ.डी.बी.कर्णिक, डॉ. अरविंद भिलवडे, प्रा. कुबेर पाटील व इतर मान्यवर प्राध्यापक |
*सौ.गीता माने : सहसंपादक*
जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर कबड्डीचे सामने, विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध खेळाचे क्रीडा साहित्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते .यावेळी जयसिंगपूरच्या ऐतिहासिक अशा विक्रमसिंह क्रीडांगणा वरून क्रीडाज्योत आणण्यात आली. यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्र. प्राचार्य डॉ.डी बी. कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी माजी प्राचार्य डॉ.अरविंद भिलवडे , प्रा. आर एस पाटील प्रा.सलीम मुजावर जिमखानाप्रमुख प्राध्यापक कुबेर पाटील, प्रा.संदीप रावळ, डॉ.मिणचेकर, आर.के. हाल्लुर, प्रा. जाधव, प्रा. चंदनशिवे आदी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक श्री सलीम मुजावर यांनी केले .मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाविषयी प्रा.कुबेर पाटील यांनी विद्यार्थीनींना माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.आर के हल्लुर यांनी केले. आभार श्री.एस्.बी. जाधव यांनी मानले.कोरोनाच्यानंतर प्रथमतःच विविध खेळाचे आयोजन झाल्यामुळे कबड्डी व संगीत खुर्ची मध्ये मोठया उत्साहाने विद्यार्थीनीनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभागप्रमुख प्रा. कुबेर पाटील, आर.के. हल्लुर, एस्.बी. जाधव,स्वप्नील पाटील, राहुल मगदूम, सर्व शिक्षक शिक्षेकत्तर कर्मचारी, सर्व खेळाडू,सर्व विदयार्थीनींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा