सांगली : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला, इंग्रजी माध्यम येथे नागपंचमी निमित्त सर्प प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राणीमित्र अक्षय मगदूम आणि पत्रकार मालोजीराव माने यांनी अँनिमल सहारा फाउंडेशन यांच्या सोबतीने विद्यार्थी तसेच शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना विषारी , बिनविषारी तसेच निमविषारी साप कोणते व ते कसे ओळखावे हे सांगितले. सोबतच साप चावल्यास प्रथमोपचार कसा करावा व तो चावूच नये यासाठी कोणती दक्षता घ्यावी याचेही मार्गदर्शन केले. साप उंदरांना खावून दरवर्षी उंदरांमुळे होणारे लाखोंचे नुकसान साप नियंत्रणात ठेवत असतो त्यामुळे साप अन्नसाखळीतील एक महत्वाचा घटक आहे. सर्वच साप विषारी नसतात, महाराष्ट्रात नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे चारच प्रमुख विषारी साप आहेत, व बाकी सर्व बिनविषारी असतात ज्यापासून मानवास कोणताच धोका नाही. घरी किंवा परिसरात साप दिसल्यास घाबरून न जाता त्यावर सुरक्षित अंतर ठेवून लक्ष द्यावे व सर्पमित्रास बोलवावे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली गोखले होत्या. या कार्यक्रमासाठी ५ वी ते १० विचे विद्यार्थी व शिक्षक व्ही. डी. जाधव, व्ही. सी. खाडे, दीपाली ओतारी, गीता मॅडम उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा