![]() |
कवडसा फाउंडेशन जयसिंगपूरच्या वतीने रक्तदान शिबिर |
*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील कवडसा फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. याच पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कवडसा फौंडेशनकडून (फॉर्च्यून शहा) रुग्ण सेवा साहित्य केंद्राच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी अविरतपणे कार्य सुरू आहे. त्याचबरोबर सध्या रुग्णांना रक्ताची नितांत आवश्यकता असून यासाठी ऑगस्ट क्रांती दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर शिबिरामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याबाबतचा आवाहन संस्थेचे संस्थापक प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे व संस्थेचे अध्यक्ष बंडू उर्फ शुक्राचार्य ऊरणकर यांनी केले आहे.
ठिकाण : संत सेना महाराज मंदिर, शाहूनगर,जयसिंगपूर
वार व वेळ : मंगळवार दि.९/८/२०२२ रोजी
सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० पर्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा