![]() |
टाकळीवाडी येथील गणेश मूर्तिकार मूर्ती बनवताना |
*टाकळीवाडी प्रतिनिधी : नामदेव निर्मळे*
टाकळीवाडी :-शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे कित्येक सालापासून गणेश मूर्ती बनवण्याचे काम जोरात चालू असते .येथील गणेश मूर्ती १ फुटापासून ते १० फुटापर्यंत तयार करतात. गणेश मूर्ती तयार करणे हा येथील पारंपरिक व्यवसाय आहे. यावरच यांचा उदरनिर्वाह चालतो.
येथील गणेश मूर्तीची मागणी कर्नाटकातील चिकोडी तालुक्यात तसेच शिरोळ तालुक्यात फार मागणी आहे .येथील लहान मुलांपासून ते वयस्कर मुलापर्यंत गणेश मूर्तीचे काम करत असतात.गणेश जयंती जवळ येत असून त्या पद्धतीने त्यांचे कामाचे स्वरूप सुद्धा जोरात चालू झाले आहे .सकाळपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत हे गणेश मूर्ती बनविण्याचे काम चालू असते.अनेक तरुण मंडळे मूर्तीची मागणी करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा