![]() |
संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे व प्रा. व्ही. के.चव्हाण |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये प्रा. व्ही. के.चव्हाण यांचा वयोमानानुसार सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे आणि कॉलेजचे प्र. प्राचार्य,प्रा.डॉ.नितीश सावंत होते.
सुरवातीस कॉलेजचे प्र. प्राचार्य,प्रा.डॉ.नितीश सावंत यांनी कार्यक्रम आयोजना बाबतचा हेतू स्पष्ट केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांनी प्रा. व्ही. के.चव्हाण व प्रा.डॉ. सौ.मनिषा काळे यांच्या हस्ते सौ.चव्हाण वहिनी यांचा सन्मान करण्यात आला.
पर्यवेक्षक प्रा. भारत आलदर यांनी प्रा. व्ही. के.चव्हाण यांच्या याच बरोबर व्यतीत केलेल्या आठवणी सांगितल्या. प्रा.डॉ.एस.एस.महाजन आणि प्रा.सुनिल चौगुले यांनी चव्हाण सरांच्या काळातील आठवणींना भावनामय उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना प्रा.व्ही. के.चव्हाण म्हणाले, माझी कारकिर्द घडविण्यामध्ये डॉ. सुभाष अडदंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. मुळात माझ्या स्वभावामुळे नोकरीच्या कार्यकाळात मला स्थिरता प्राप्त झाला नाही. मात्र माझी आर्थिक स्थिती पाहून डॉ.अडदंडे सरांनी केलेल्या सहकार्याची मी परतफेड कधीही करू शकत नाही. कॉलेजमधील संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, सर्व प्रशासकीय कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे मी आज आनंदाने सेवानिवृत्त होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सुभाष अडदंडे म्हणाले, प्रा.चव्हाण यांनी आपल्या आयुष्यात कायम नोकरी मिळाली नाही म्हणून नाराज झाले नाहीत. उलट स्वतःच्या कर्तुत्वावर खाजगी शिकवणी च्या माध्यमातून संसाराचा गाडा चालविला. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि कडक शिस्त ही त्यांच्या स्वभावाची गुण वैशिष्ट्ये होती. भौतिक शास्त्र बद्दल असलेले प्रचंड ज्ञान व अध्यापनाची हातोटी या आधारावर त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. भारत आलदर यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौ.चावरे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी मा.अशोक शिरगुप्पे, मा.शशांक इंगळे,डॉ. शीतल पाटील,मा.खाडे, उपप्राचार्य, कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम,महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापकवृंद,प्रा.चव्हाण यांचे नातेवाईक, मित्र परिवार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत सुंदर पद्धतीने हा भावनामय निरोप समारंभ संपन्न झाला.
सदर कमिटीने अत्यंत उत्तम पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केलं होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा