![]() |
मालू हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप |
*सौ.गीता माने : सहसंपादक*
जयसिंगपूर : 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूरच्या 9 छात्रसैनिकांना कॅडेट वेलफेअर सोसायटी शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यापैकी 8 छात्रसैनिक हे लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूरचे विद्यार्थी आहेत. प्रत्येकी 6000/- रुपये व प्रमाणपत्र असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.
एनसीसी मधील विशेष प्रावीण्य व शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
कर्पोरल मानसी कदम, सीक्यूएमएस समीक्षा आडके, कॅडेट मृणाल गवंडी, कॅडेट स्नेहल कोळी, कॅडेट आदिती अथणे, कॅडेट साद मणेर, कॅडेट रिहान मुल्ला, कॅडेट शुभम पोवार या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
या कॅडेटसना एनसीसी ऑफिसर सतीश भोसले, 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सायना यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळा समितीचे अध्यक्ष मा. राजेंद्र मालू, शाळा समितीचे सदस्य मा. चंद्रकांत जाधव, मा. प्रसन्ना कुंभोजकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा. आर आय पोवार सर, पर्यवेक्षक मा. श्री आर जी देशपांडे, शाळा समिती, व्यवस्थापन समिती यांनी शिष्यवृत्तीधाराकांचे अभिनंदन व कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा