Breaking

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये शहीद भगतसिंग यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त देशभक्तीपर गाण्याचा कार्यक्रम संपन्न*


जयसिंगपूर कॉलेजमध्ये शहीद भगतसिंग जयंती उत्साहात साजरी


*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : जयसिंगपूर कॉलेजमध्ये शहीद भगतसिंग यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त व आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. महावीर अक्कोळे व  प्र.प्राचार्य डॉ. एन.पी.सावंत उपस्थित होते.

    यावेळी साथी बाबासाहेब नदाफ व शाहीर रफिक पटेल या जोडीने  देशभक्तीपर गाण्याच्या सादरीकरणाने उपस्थित विद्यार्थ्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण केले.''मेरा रंग दे बसंती चोला' या गाण्याने सुरुवात केली आणि वामनदादा कर्डक यांच्या बहारदार गाण्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभक्तीचे चैतन्य जागे केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची दंगदार गाणी सादर करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली.

         डॉ. महावीर अक्कोळे यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये विद्यार्थ्यांना वास्तव परिस्थितीशी भेटताना जागे राहण्याचे  आवाहन केले. आजच्या परिस्थितीमध्ये भगतसिंगासारखे प्रत्येक तरुणाचे निर्भीड व्यक्तिमत्व असावे.

      कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत डॉ. एन.पी.सावंत यांनी केले. कार्यक्रम आयोजनाचा हेतू डॉ. टी. जी.घाटगे यांनी प्रस्तुत केला. कॉलेजची उप प्राचार्य डॉ.एस.बी. बनसोडे यांनी आभार प्रदर्शन केले.तसेच डॉ. सुनंदा शेळके यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.

   या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा